या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण कालावधी दरम्यान जी ज्ञानार्जनाची शिदोरी या एका वर्षात आपण प्राप्त केली आहे त्याद्वारे यश खेचून आणण्यासाठी प्रयत्शील रहा. जिथे असाल तिथे आनंदी राहून सुखदुःखात साद देत चला,आई बाबांच स्वप्न पूर्ण करा, उद्दिष्टाबद्दल प्रामाणिक राहा आणि संघर्ष करून प्रकाशमय जीवन जगण्याचा प्रयत्न करा. प्रशिक्षण संपले तरीही गरज असलेल्यांसाठी आमच्या प्रशिक्षण केंद्राचे दरवाजे सदैव उघडे आहे. येथील कोणत्याही साधनांचा ऊपयोग करून आपण बहुसंख्येने शासकीय सेवेत जावे तोच खरा आनंदाचा परतावा आमच्यासाठी ठरेल असे ते म्हणाले