संबोधी अकादमी, महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद येथे संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे सर यांच्या अध्यक्षतेखाली महाज्योति पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण च्या प्रशिक्षणार्थींना आज दि.24 फेब्रुवारी 2023 रोजी माननीय राजेशजी खवले साहेब (व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर ) यांच्या हस्ते पुस्तकांचे वितरण करण्यात आलेकार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतातील आद्य शिक्षिका माता सावित्री यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर विचार मंचावर उपस्थित प्रमुख अतिथींच तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती, शाल, व पुष्पहार देऊन आदरातिथ्य व स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे संचालक आदरणीय समाजभूषण माननीय भीमराव हत्तीअंबीरे यांनी केले