संबोधी अकादमी महाराष्ट्र , संचलित व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे मान्यताप्राप्त, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबादच्या वतीने तसेच मा. समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे सरांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली, समाजाबरोबर निसर्ग संरक्षणाच भाण असणारे उत्कृष्ट अधिकारी घडविण्यासाठी एम.पी.एस.सी पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींच्या मदतीने आज दि. 25 डिसेंबर 2022 रविवार रोजी बुद्ध लेणी क्रमांक सात च्या पायथ्याशी विजयिन्द अरण्य विहार येथे "वृक्षरोपण व वृक्ष संवर्धनाचा" उपक्रम आयोजित करण्यात आला , याअंतर्गत वृक्षांच्या आजूबाजूचे वाळलेल गवत काढण्यात आले ,व वृक्षांना आळे करण्यात आले ,परिसरातील कचराही साफ करण्यात आला.