समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवुन अखंड महाराष्ट्रासमोर वेगळी ओळख निर्माण केली आहे, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रातील तज्ञ प्रशिक्षक आणि एमपीएससी, आयबीपीएस, पोलीस-मिलिटरी पूर्व भरती प्रशिक्षणार्थ्यांनी संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी संचालक तथा अध्यक्ष समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांचा वाढदिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून साजरा केला, समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे यांचा मराठवाड्यासह संबंध राज्यभरात संबोधी मित्र परिवार कार्यरत आहे, प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रेल्वे स्टेशन, बसस्टँड परिसरात गरजवंतांना ब्लॅंकेटचे वाटप, शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप असे अनेक समाजभिमुख उपक्रम राबविण्यात येत असतात.