संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथे संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.09 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणार्थी मुळ बॅच यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानिमित्तानं निरोप समारोप समारंभ आयोजित करण्यात आला.याप्रसंगी दुपारी 02 वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.. यात सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी सहभागी होऊन प्रशिक्षण केंद्रातील आपल्या आठवनींचा आनंदोत्सव साजरा केला.त्यानंतर संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे शिस्तप्रिय असलेले संचालक आदरणीय समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे सरांनी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधीत केले.आपल्या संभाषणात ते म्हणाले की, या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण कालावधी दरम्यान जी ज्ञानार्जनाची शिदोरी या एका वर्षात आपण प्राप्त केली आहे त्याद्वारे यश खेचून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा... तुमच्या यशस्वी भवितव्यासाठी ज्या काही ज्ञानरंजनाची तुम्हाला गरज भासेल ती, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही मी व माझं प्रशिक्षण केंद्र आपणास पुरविण्यात तत्पर राहील असे ते म्हणाले....
यानंतर प्रशिक्षण कालावधी दरम्यान ज्या प्रशिक्षणार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली त्या प्रशिक्षणार्थ्यांचा आदरणीय संचालक समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यानंतर प्रशिक्षण केंद्राच्या महाव्यवस्थापक प्रा. भाग्यश्री सातदिवे यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.शेवटी सर्व प्रशिक्षणार्थिंचा group डान्स झाल्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.याप्रसंगी संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रातील सर्व प्राध्यापक वृंद, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व प्रशिक्षणार्थी आदींची उपस्थिती होती.