Sambodhi Academy News

रक्तदान शिबिर संपन्न_1702706712_.jpeg
मराठवाडा साथी | 2023-07-12
रक्तदान शिबिर संपन्न

संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे रक्तदान शिबिर संपन्न.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 06 डिसेंबर रोजी संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र ,छत्रपती संभाजीनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उदघाटक म्हणून मा.डॉ. उन्मेश टाकळकर ( संचालक, सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर) हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणुन मा.पवनकुमार (डेप्युटी कमांडंट , CISF छत्रपती संभाजीनगर विमानतळ),मा.रविन्द्र जोगदंड राज्य कर उपायुक्त वस्तु व सेवा कर विभाग नाशिक) ,मा.जलील शेख ,( प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर) ,हे उपस्थित होते.यासोबतच विचार मंचावर सुरेश पेडगावकर (से.नि. सचिव मंत्रालय ,मुंबई) ,डॉ. महेंद्रसिंग चव्हाण सर( डायरेक्टर ,सत्यसाई ब्लड सेंटर औरंगाबाद) , भन्ते बोधीपालो थेरो, भन्ते निर्वाण, मा.निळकंठ डाके, निवृत्त जॉइन्ट कमिश्नर GST कर विभाग ), डॉ. ज्ञानेश्वर झाडे , सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद. यांची उपस्थिती होती.

Recent News