Sambodhi Academy News

संबोधी अकादमी  औरंगाबाद च्या रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी केले रक्तदान_1670475829_.jpeg
मराठवाडा साथी | 2022-12-08
संबोधी अकादमी औरंगाबाद च्या रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी केले रक्तदान

दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी संबोधी अकादमी महाराष्ट्र संचालित व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर मान्यताप्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथे संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे उदघाटक मा.मनीषजी कलुवानिया, भा.प्र.से. (जिल्हा पोलीस अधीक्षक, औरंगाबाद (ग्रामीण) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. उन्मेष टाकळकर (संचालक, सिग्मा हॉस्पिटल,औरंगाबाद), प्रमुख अतिथी संतोषजी वाहुळे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी महानगरपालिका, औरंगाबाद), डॉ. आनंद पाटील (संचालक, स्टडी सर्कल, पुणे तथा स्पर्धा परीक्षा चळवळीचे जनक) यांची उपस्थिती होती, मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तद्नंतर रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले

Recent News